चहा प्या आणि कप खाऊन टाका!

मुंबईतील शिवाजी पार्क भागात या प्रकारचा भन्नाट चहा मिळतोय.

या ठिकाणी चहा पिल्यानंतर कप खाता येतो. 

आशुतोष चौधरी या तरुणाने इंजिनिअरिंगच जॉब सोडून 'स्वादिष्टम चहा' हा व्यवसाय सुरू केलाय.

त्यावेळी चहा दिला जाणाऱ्या प्लॅस्टिक कपमुळे कचरा होतो, असं त्याच्या लक्षात आलं. 

या कचऱ्यावर उपाय म्हणून त्यानं बिस्किटचे कप तयार केले. 

 या कपात 15 मिनिटं चहा ठेवला तरी तो तसाच राहतो.

हा कप अनेक प्रकारचे धान्य वापरुन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तो पौष्टिक आहे.

चहा पिल्यानंतर तो कप खाता येतो. खायचा नसेल तर डिस्पोजही करता येतो, असं आशुतोषनं सांगितलं.

झिरो वेस्ट प्रोडक्ट असलेल्या या चहाची किंमत 15 रुपये आहे.

हा चहा फक्त शनिवार आणि रविवारीच शिवाजी पार्क येथील जिम बाहेर मिळतो.