कचऱ्याची समस्या दूर होण्यासाठी उभारले ‘इथं’ शिल्प! 

रस्त्यावरील कचरा ही प्रत्येक शहरातील मोठी समस्या असते. 

रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे शहर अस्वच्छ दिसते. 

त्यामुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी कल्याण येथे राहणारा एक अवलिया प्रयत्न करत आहे. 

ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो. त्या ठिकाणी विविध शिल्प उभारत सेल्फी पॉइंट त्याने तयार केले आहेत. 

 यामुळे काही ठिकाणी कचरा फेकणे बंद झाले आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे.

 अनेक ठिकाणी पालिकेकडून सर्व सुविधा देऊनही रस्त्यावर कचरा फेकला जात आहे.

त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर कचरा फेकू नये यासाठी स्वच्छता दूत विजय भोसले काम करत आहेत. 

त्यांची सहयोग सामाजिक संस्था आहे. ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो त्या ठिकाणी ते सेल्फी पॉइंट उभारतात.