पहिल्याच पावसात डोंबिवलीत साचलं पाणी!
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर डोंबिवलीत पावसानं दमदार हजेरी लावलीय.
बुधवार (28 जून) सकाळपासून शहरात पावसानं जोर धरलाय. या पावसानं शहरातली सखल भागात पाणी साचलंय.
मोठे नाले आणि गटारे यांची पूर्णत: साफसफाई न झाल्यानं काही भागात चाळीत पाणी शिरले होते.
तसेच डोंबिवली स्टेशनच्या पूर्व भागातील दुकानदारांचेही पावसानं हाल झाले.
डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक आणि स्टेशनपरिसरात पाणी तुंबल्याने रिक्षा चालकांना, पादचाऱ्यांना तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला.
या भागातील दुकानदारांनाही पाणी तुंबल्याचा फटका बसला. दुकानातील सामानाची नासाडी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
औद्योगिक विभाग, मिलापनगरमध्ये पावसामुळे पाणी तुंबले होते.
तेथील सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांची उंची वाढविल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
बुधवारच्या पावसात ते सिद्ध झालं. कल्याण डोंबिवली महापालिकेनं गटारांची साफसफाई केल्याचा दावा पावसाळा सुरू होण्यापूर्वी केला होता.
तो दावा फोल ठरल्याचं सिद्ध झालंय.