चक्क शाळेनं सुरू केली बॅंक
प्रत्येक शाळा आणि शिक्षक आपल्या शाळेतून उत्तम विद्यार्थी घडावे यासाठी प्रयत्न करत असतात.
विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी शाळेत दिलेले शिक्षण ते विसरत नाहीत.
लहानपणापासून विद्यार्थ्यांना चांगली सवय लागावी यासाठी डोंबिवलीतील जन गण मन या शाळेने शाळेतच सेव्हिंग बँक सुरू केली आहे.
या छोट्याशा बँकेत विद्यार्थी कॅशियर, टेलर, मॅनेजर अशी वेगवेगळी कामं करतात.
शाळेतून बाहेर पडताना त्यांनी कोणत्याही ठिकाणी कमी पडू नये.
या विचारानेच हे उपक्रम राबवत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेरणा कोल्हे यांनी सांगितलं.
3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. याच दिवसाचं औचित्य साधून शाळेत ही छोटी बँक सुरू झाली.
शाळेने एक पासबुक दिले असून एक पास बुक युनियन बँकेचे आहे.
विद्यार्थ्यांनी पैसे दिल्यानंतर टेलर असलेला विद्यार्थी शाळेच्या पास बुकवर आणि संगणकावर नोंद करतो. ही नोंद नंतर बँकेच्या पासबुकमध्ये केली जाते.