इंजिनिअर तरुण बनला डोंबिवलीचा ‘लाडू सम्राट’

कुणी लग्नाळू असेल तर, ‘आम्हाला आम्हाला लाडू कधी मिळणार?’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. 

मराठी कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यात लाडू केले जातात. 

शूभकार्यात महत्त्व असलं तरी इतर गोड पदार्थांच्या गर्दीत एरवी लाडू हा पदार्थ मागे पडला आहे. 

डोंबिवलीचे इंजिनिअर श्रीजय कानिटकर यांनी याच लाडवाला घरोघरी पोहचवण्यासाठी खास उद्योग सुरू केलाय.

श्रीजय यांनी त्यांच्या वडिलांच्या मदतीनं साजूक तुपातल्या लाडूचं दुकान सुरू केलंय. 

या दुकानात एक किंवा दोन नाही तर तब्बल 50 प्रकारचे लाडू मिळतात. 

गुलकंद लाडू, बुंदी,रवा, बेसन, डिंक, आळीम, खोबरं अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू या दुकानात मिळतात.

धान्य भाजून त्याचे पीठ काढून त्यात कधी रवा, कधी खोबरं, गूळ किंवा साखर, साजूक तूप अशा विविध पदार्थांचे मिश्रण करून हे लाडू वळले जातात. 

 आम्ही दिवसाला अडीच ते तीन हजार लाडू तयार करतो, असं श्रीजयनं सांगितलं.