लेज आणि चॅाकलेट शेवपुरी कधी खाल्ली का?
शेवपुरी, भेळपुरी रगडा पॅटीस हे बहतेकांच्याच आवडीचे पदार्थ आहेत.
चटपटीत खायची हुक्की आली की आपल्याला हे पदार्थ हमखास आठवतात.
पोट आणि जीभ दोन्ही तृप्त करणाऱ्या या पदार्थांच्या स्टॉलवर नेहमीच गर्दी असते.
आपल्या स्टॉलवरील ही गर्दी कायम राहावी यासाठी चाट विक्रेते नवीन आयडिया करत आहेत.
डोंबिवलीतील एका विक्रेत्यानं चक्क चॉकलेट लेज शेवपुरी सुरू केलीय.
हा हटके पदार्थ तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.
डोंबिवली पूर्वेच्या पेंढारकर कॉलेज रोडला तरुणाईची नेहमी गर्दी असते.
पेंढारकर कॉलेज समोरच्या अमन भेळपुरी या स्टॉलवर ही चॉकलेट लेज शेवपुरी मिळते.
एक प्लेट डिशची किंमत 50 रुपये आहे.