हे आहे भुतांचं गाव, प्रत्येक घरासमोर कबर

झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरासमोर एक कबर आहे.

इथे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी भूतांची पूजा केली जाते. त्यामुळे या गावाचे नाव भुताचे गाव झाले आहे. 

रांचीपासून 40 किमी अंतरावर खुंटी जिल्ह्यात हे भुताचे गाव आहे. इथे प्रत्येक घराबाहेर कबर बांधल्या आहेत. 

या कबरींची नेहमी पूजा केली जाते आणि भूताची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य अपूर्ण राहते. 

 भूतांची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

भूत गावातील रहिवासी प्रकाश सांगतात की, या गावात 300 हून अधिक घरे आहेत आणि प्रत्येक घराबाहेर एक कबर आहे. 

जेव्हा जेव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या नावाने घराबाहेर एक कबर बनवली जाते आणि त्यात त्या व्यक्तीची सर्व माहिती असते. 

तो व्यक्ती कोणत्या दिवशी मरण पावला, अंतिम संस्कार कोणी केले, किती लोकांना अन्नदान करण्यात आले, अन्नदानाचा खर्च कोणी उचलला, कोणत्या रोगाने तो मरण पावला, तो किती वर्षे जगला, अशी सर्व माहिती त्यावर असते.

प्रकाश सांगतात की, वर्षभरात होणार्‍या सर्व शुभ कार्यात मग ते लहान मुलांचे मुंडण असो, वाढदिवस असो किंवा घरातील कोणतीही छोटीशी पूजा असो, आधी भूतांची पूजा केली जाते.