दररोजच्या वापरण्यात येणारं लाटणं कसं बनवितात माहिती आहे का?
पोळीला किंवा चपातीला योग्य आकार देण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे लाटणं.
पोळीला किंवा चपातीला योग्य आकार यावा यासाठी लाटण्याचा खूप मोठा वाटा आहे.
मुंबईमध्ये एका महोत्सवाच्या निमित्तानं आलेले तानाजी यादव यांनी हे लाटणं कसं बनवितात याची माहिती दिली आहे.
आंबा, बाभळी, बोर या झाडाच्या लाकडापासून आम्ही गेली अनेक वर्ष लाटणं बनवतो.
तसेच याच लाकडापासून रवी, पोळपाट, लाटणं, पापडाचं लाटणं, चमचे अश्या घरगुती वस्तू ज्या स्वयंपाक घरात वापरल्या जातात त्या बनवितो.
दीड फुटाच्या लाकडातून पारंपरिक मशीनच्या साहाय्याने काही अवजार वापरून त्या लाकडी ओंडक्याला लाटण्याचा आकार दिला जातो.
या लाटण्यांची किंमत साधारण 70 रुपयापासून 150 रुपये इतकी असते, असं तानाजी यांनी सांगितलं.