भारतात वसलंय 'पाकिस्तान', जिथे सर्व लोक आहेत हिंदू
पाकिस्तानचे नाव ऐकल्यावर भारतात अनेक लोक संतापतात. पण त्याच भारतात एक ‘पाकिस्तान’ आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर श्रीनगर ब्लॉकच्या सिंधिया पंचायतमध्ये एक गाव आहे, ज्याचे नाव पाकिस्तान आहे.
या गावाची एकूण लोकसंख्या 1200 आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या गावात हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या संथाल आदिवासींची वस्ती आहे.
हा भाग शहरी लोकसंख्येपासून पूर्णपणे तुटलेला आहे. इथल्या लोकांनाही हिंदी नीट बोलता येत नाही.
हे लोक मोलमजुरी करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या गावात शासकीय सुविधांचा अभाव आहे. येथे ना शाळा आहेत ना रुग्णालये.
पाकिस्तान गाव ते श्रीनगर ब्लॉकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर सुमारे 12 किमी आहे, तर शाळा सुमारे 2 किमी अंतरावर आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, या गावाला पाकिस्तानातून हे नाव कसे पडले याचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही. परंतु येथील काही लोकांचे म्हणणे आहे की, या गावात पूर्वी पाकिस्तानी लोक राहत होते.
स्वातंत्र्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आणि येथे राहायला आलेल्या लोकांनी या गावाचे नाव तसेच राहू दिले.