कोण आहे 'मुंबईची चहा क्विन'?

चहा व्यवसायाचा विस्तार झाला असला तरी आजही या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे. 

मुंबईतील एका महिलेनं पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात स्वत:ची जागा निर्माण केलीय.

 मुंबईची चहा क्वीन म्हणून आज त्यांना अनेकजण ओळखतात.

कसा झाला प्रवास?
दादरच्या कालिका दर्शन इमारतीमध्ये राहाणाऱ्या वंदना शिरसाट घर कामासोबतच चहा विक्रीचा व्यवसाय करतात. 

 त्यांनी लॉकडाऊनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय. घरीच चहा बनवून त्या दादर, लोअर परळ, परिसरातील बँक, दुकांन, ऑफिसेसमध्ये जाऊन विकतात.

इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त 6 रुपयांमध्ये हा चहा जागेवर बसून मिळतो.

वंदना यांनी हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बराच संघर्ष केलाय. त्यांचे पती अनिल शिरसाट यांची 1997 साली नोकरी गेली.

या कसोटीच्या प्रसंगात घर चालवण्यासाठी त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. घरोघरी दूध आणि पेपरची विक्री त्या करत असत. 

दूध विक्री, रांगोळी, कॅलेंडर, गुळ विक्री, मसाला पापड, वडापाव, नाशिक चिवडा असे अनेक व्यवसाय त्यांनी केले.

 पण, त्यांना कोणत्याही व्यवसायात यश मिळालं नाही. त्यानंत त्यांनी चहा विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं.

 माझे पती कुरिअर कंपनीत कामाला आहेत. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. दुकानाचं भाडं सध्या आम्हाला परवणार नाही.

पण, व्यवसाय व्यवस्थित सुरू राहिला तर लवकरच छोटं दुकान सुरू करण्याची इच्छा आहे, असं वंदनानं सांगितलं.