पिकांचं संरक्षण करणारी बंदूक
शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते.
तसेच वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त असतात.
हे नुकसान कमी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अहंकार देऊळगाव येथील एका विद्यार्थ्यांने बंदूक बनवली आहे.
नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव ज्ञानेश्वर खडके आहे.
ज्ञानेश्वर हा राष्ट्रीय हिंदी विद्यालयात शिक्षण घेत आहे.
रिकामी प्लास्टिक बाटली, प्लास्टिक पाईप तसेच इतर किरकोळ साहित्य वापरून ही प्लास्टिकची बंदूक तयार केली आहे.
या बंदुकीच्या आवाजामुळे प्राणी पळून जातात व पिकांचे संरक्षण होते.