कला प्रदर्शनामध्ये अनुभवा ग्रामीण जीवन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ललित कला विभागातर्फे वार्षिक कला प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
हे प्रदर्शन ललित कला विभागात भरवण्यात आले आहे.
शहरीकरणामुळे ग्रामीण जीवन आपण विसरलो आहे.
ग्रामीण जीवन कसे आहे हे दाखवण्याच्या प्रयत्न या प्रदर्शनात करण्यात आला आहे.
अजिंठा लेणी येथील वेगवेगळ्या कलाकृतींचे एक सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील गोगाबाबा टेकडी चित्र कलाकाराने रेखाटले आहे.
हे प्रदर्शन 21 मार्चपर्यंत सुरु असणार आहे.