मंडपाच्या दरात मंगल कार्यालय दारात!

आणखी पाहा...!

गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं.

लातूरमधील दयानंद दरेकर हे मंडप व्यवसायिक आहेत. 

परंपरागत मंडपाचा व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

दरेकर यांनी थेट चालते फिरते मंगल कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला.

एका ट्रक मध्ये दरेकर यांनी मोबाईल मंगल कार्यालयाची सुरुवात केली. 

यात AC हॉल, साऊंड सिस्टीम, स्टेज व अत्याधुनिक सर्व सोई सुविधा आहेत. 

हॉलची साइज 30x40 फूट असून खुर्चीवर 150 ते 200 लोक सहज बसू शकतात.

मोबाईल मंगल कार्यालयामुळे मंडपाचा खर्च 30 ते 40 हजारात भागत आहे.

या कार्यालयात लग्न समारंभासह विविध कौटुंबिक कार्यक्रम करता येतात.

स्नेह संमेलन, सेमिनार असे विविध राजकीय शैक्षणिक कार्यक्रमही करता येतात. 

हे मोबाईल मंगल कार्यालय पाहिजे तिथे घेऊन जाता येते.

उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही मोबाईल मंगल कार्यालयाची दखल घेतली.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मोबाईल मंगल कार्यालय सुरू करण्याचा मानस आहे.