बहीण-भाऊ झाले पोलीस! 

 मुलगा दोन वर्षाचा तर मुलगी फक्त 6 महिन्याची असताना पतीचं अपघाती निधन झालं. 

या मोठ्या संकटानंतरही न डगमगता त्या माऊलीनं सर्व कुटुंबाचा भार पेलला.

दोन्ही मुलांना शिक्षणासाठी बळ दिलं. आज त्यांच्या कष्टाचं चीज झालंय.

त्यांची दोन्ही मुलं पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

जालना जिल्ह्यातल्या बहिण-भावांनी मिळवलेलं हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारं आहे.

भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील सामान्य कुटुंबातील सख्या बहीण-भावाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. 

 या भावंडांची पुणे शहर पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल म्हणून निवड झालीय. 

 निर्मला गवळी आणि ज्ञानेश्वर गवळी अशी या भावंडांची नावं असून त्यांनी घरामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना हे यश मिळवलंय.

 मी केलेल्या कष्टाचं मुलांनी चीज केल्यानं पोरांचा अभिमान आहे,असं कडूबाई गवळी यांनी सांगितलं.