दादरमध्ये कपड्यांचं मोठं मार्केट असून या ठिकाणी कपडे खरेदीसाठी देशभरातून लोक येत असतात.
दादर मार्केटमध्ये महिला, पुरुष, लहान मुलांची विविध प्रकारची कपडे मिळतात.
होलसेल दरात कपडे मिळत असल्याने मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते.
दादर पूर्वेकडे हिंदमाता मार्केट असून येथे 150 रुपयांपासून साड्यांची विक्री होते.
150 रुपयाला मिळणाऱ्या साड्यांमध्ये गार्डन साड्या प्रसिद्ध आहेत.
काठपदरी, बुट्टेदार डिझाईनच्या साड्या, विविध रंगाच्या साड्या येथे उपलब्ध आहेत.
साध्या साड्यांसोबतच कांजीवरम, पेशवाई, सिल्कच्या विविध प्रकारच्या साड्या येथे उपलब्ध आहेत.
लग्नाच्या बस्त्यांसाठी दादरचे हे मार्केट हमखास गर्दीने भरलेले असते.
या मार्केटमध्ये स्वस्त साड्या मिळत असल्याने महिला वर्ग येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येतात.
लग्न, दुकान किंवा घरगुती कार्यक्रमासाठी साड्यांची खरेदी करण्यासाठी दादर मार्केट हा चांगला पर्याय आहे.
दिव्यांगांसाठी बनवली सौर सायकल!
Click Here