वाह! आता अयोध्येच्या सरयू नदीत चालणार क्रूझ

रामाची नगरी अयोध्या सजवली जात आहे. येथील मठ आणि मंदिरांचा जीर्णोद्धार केला जात आहे.

यातच आता आणखी एक आनंदाची बाब आहे, ती म्हणजे आता दुबईच्या धर्तीवर सरयू नदीत क्रूझ चालवण्याची तयारी सुरू आहे.

दुबईतील मरीनच्या धर्तीवर अयोध्येत क्रूझ ऑपरेशन करण्याची योजना पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात येईल. 

अयोध्येत येणारे पर्यटक आणि भाविक क्रूझमध्ये राहण्यासोबतच सरयूच्या पाण्याच्या प्रवाहात विविध पदार्थांचा आस्वाद घेतील. 

 ही क्रूझ नया घाट ते गुप्तर घाटापर्यंत सुमारे 15 किलोमीटरच्या परिसरात चालवली जाईल. एकावेळी दीडशे पर्यटक बसून त्याचा आनंद घेऊ शकतील.

तसेच यात आठ ते बारा खोल्या असतील. या क्रुझमध्ये पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध असतील.

याशिवाय क्रूझमध्ये प्रवास करणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे अयोध्येतील संस्कृती आणि सभ्यतेची ओळख करून दिली जाईल. 

भगवान रामाच्या जीवनावर आधारित लघुकथेचेही वर्णन केले जाईल जेणेकरुन देशातील आणि जगातील लोकांना भगवान रामाची संस्कृती आणि सभ्यता, अयोध्येची माहिती व्हावी.

दीपोत्सवापर्यंत अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले.