अवकाळीने झोडपलं, राज्यातील परिस्थिती VIDEO

नागपूरात सकाळी जोरदार वारा,ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस बरसला.

धुळवडीच्या दिवशी झालेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचे रंग उडाले

मात्र, या अवकाळीने शेतात असलेल्या गहू, हरबरा, संत्रा, आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे गहू, मका, पिकांना मोठा फटका बसला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात पिकांचं मोठ नुकसान झाले आहे.

सुमारे तीन हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.

त्यामुळे सरकारने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.