आता नारळ फोडल्यानंतर एक थेंब पाणी वाया जाणार नाही! पाहा कसं आहे यंत्र
मंदिरात देवासमोर फोडलेल्या नारळातील पाणी वाया जाऊ नये म्हणून कोल्हापुरातील प्राध्यापकांनी एक खास यंत्र तयार केलं आहे.
दत्ता सुतार हे या कोल्हापूरातील संशोधक प्राध्यापकाचं नाव आहे. त्यांना मंदिरात वाया जाणारे नारळ पाणी पाहून हे यंत्र तयार करण्याची कल्पना सुचली.
कोणत्याही ठिकाणी ठेवता येऊ शकेल असे हे साधारणतः 2 फूट उंचीचे मशीन आहे.
मशिनच्या वरच्या बाजूला वरच्या बाजूला नारळ वाढवण्यासाठी एक स्टीलचे बफिंग केलेला अँगल बसवण्यात आलेला आहे. त्याखाली एक ट्रे आहे.
या ट्रेला चारही कोपऱ्यांना होल करून त्यातून हे पाणी खाली ठेवण्यात आलेल्या बाटलीमध्ये साठवले जाते.
हे नारळपाणी संकलन यंत्र बनवण्यासाठी 5 हजार रूपये खर्च आला आहे.
या मशिनच्या संकल्पनेचा वापर करून गरजवंतांसाठी उपकरणाची निर्मिती करता येऊ शकते, त्यामुळे याचे पेटंट घेतले नसल्याचं सुतार यांनी सांगितलं.