भरड धान्यापासून बनवले 63 पदार्थ!

आणखी पाहा...!

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजने केले जाते. 

बीड येथील जन शिक्षण संस्थेने अनोख्या पाककृती स्पर्धेचे आयोजन केले

या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

भरडधान्यापासून बनवलेले तब्बल 63 पदार्थ ठेवण्यात आले होते.

सर्वाधिक जीवनसत्त्व असणारे खाद्यपदार्थ स्पर्धेत बनवण्यात आले होते. 

यामध्ये जवळपास 63 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. 

बहुधा दैनंदिन आहारात न दिसणारे पदार्थ या ठिकाणी होते

भरड धान्ये ही आरोग्यासाठी उत्तम आहेत. 

भरडधान्यात सर्वाधिक फायबरचे प्रमाण असते. 

स्पर्धेत नाचणीपासून तयार केलेल्या इडलीने सर्वांचे लक्ष वेधले.

बाजरीची पारंपरिक तीळ लावलेली भाकरी आणि पौष्टिक थाळीही भारी होती.

बाजरीपासून तयार केलेली खिचडी व ज्वारीचा उपमा हे पदार्थही याठिकाणी होते.

प्रत्येक पदार्थाची एक खास रेसिपी होती त्याची माहितीही देण्यात आली.

महाराष्ट्रात सर्वाधिक भरडधान्यांचे उत्पादन घेतलं जातं.