शालेय विद्यार्थ्यांना अंतराळातील चंद्र, ताऱ्यांबाबत कुतुहल असते.
बीडमधील विद्यार्थ्याला खगोल संशोधनाचे वेध लागले आहेत.
माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील हा 12 वर्षांचा विद्यार्थी आहे.
अभिनव विटेकर हा सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये सहावीत शिकतो.
इयत्ता दुसरीपासूनच खगोलशास्त्राच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली.
अभिनवला खगोलशास्त्रज्ञ व्हायचे आहे.
जागतिक स्तरावरील खगोलशास्त्रज्ञांची पुस्तके अभिनव वाचतो.
दूर्बिणीतून तो खगोलीय घटना, घडामोडींचा अभ्यास करतो.
शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्याशी एका कार्यक्रमात त्याची भेट झाली.
आता अभिनव राज्यस्तरीय खगोल संमेलनात सहभागी होणार आहे.
रत्नागिरीत 15 ते 17 एप्रिलदरम्यान 12 वे खगोल संमेलन होणार आहे.
मराठवाड्यातून संमेलनाला संधी मिळालेला अभिनव एकमेव विद्यार्थी आहे.