विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञानाचे धडे!

 मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. 

अशातच विद्यार्थ्यांना अध्यात्माचे ज्ञान व्हावे यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये अध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

 यामध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे देण्यात आले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

मुलांवर चांगले संस्कार व्हावे तसे त्यांना अध्यात्माची गोडी लागावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुली सुद्धा सहभागी झाल्या होत्या. 

तसेच या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चातून या शिबिराचे आयोजन केले होते. 

यामध्ये विद्यार्थ्यांना हरिपाठ, भजने, संतांचे अभंग, संतांचे चरित्र त्याचबरोबर वारीमध्ये जी पावली खेळली जाते या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.