50 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचं गाव!
प्रत्येक गावाचं एक खास वैशिष्ट्य असतं. त्या वैशिष्ट्यामुळे त्याची सर्वत्र ओळख असते.
काही गावं निसर्गसंपन्न वारशासाठी तर काही मानवनिर्मित गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं एक गाव सरकारी नोकरदारांसाठी प्रसिद्ध आहे.
या गावात फक्त 75 घरं आहेत, त्यापैकी 50 पेक्षा जास्त घरातील मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकरीत काम करतात.
पैठण तालुक्यातील सानपवाडी असं या गावाचं नाव आहे. या गावाची 400 लोकसंख्या आहे.
त्यामध्ये एक उपविभागीय अधिकारी, एक सहाय्यक पोलीस निरिक्षक, एक पोलीस निरीक्षक, 23 पोलीस कर्मचारी, पाच शिक्षक आणि सहा जण भारतीय सैन्य दलात आहेत.
त्याचबरोबर पाच इंजिनिअर आणि सहा डॉक्टर देखील या गावात आहेत.
या गावात पाण्याचा दुष्काळ असला, तरी गुणवत्तेच्या बाबतीत पुढारलेले आहे. या गावाला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जात होते.