‘इथं’ घ्या 125 पराठ्यांचा आस्वाद!
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत या ऐतिहासिक गोष्टींबरोबरच शहरांमध्ये तुम्हाला नवनवीन पदार्थांचे चाखायला मिळते.
संभाजीनगरमधील उस्मानपुरा भागात असलेल्या जीजा पराठा हाऊस मध्ये तब्बल 125 प्रकारचे पराठे भेटतात.
जिजा पराठा हाऊस हे विशाल कश्यप आणि त्यांची पत्नी उज्वला कश्यप यांनी सुरू केले आहे.
शहरातील लोकांना वेगळं काहीतरी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी हे पराठा हाऊस सुरू केले.
आम्ही सुरुवातीला नेहमीच्या पराठ्यांपासून सुरूवात केली. त्यानंतर पराठ्याचे वेगवेगळे प्रकार सुरू केले.
आज आमच्याकडं तब्बल 125 प्रकारचे पराठे मिळतात.
आलू, मेथी, पालक, गोबी, पनीर, गाजर, ओनियन, मिक्स व्हेजिटेबल पराठा या ठिकाणी मिळतो.
याच बरोबर चीझ पराठा, चीज कॉर्न पराठा, टोमॅटो पराठा, आलू मेथी पराठा, भेंडी पराठा हे प्रकार देखील आमच्याकडे मिळतात.
या नेहमीच्या पराठ्यासोबतच शिवशाही, मोगलाई, तिरंगा, शेजवान, मशरूम, मेक्सिकम, इटालियन तसंच ठेचा पराठा देखील आम्ही ग्राहकांना देतो.
जिजा स्पेशल चीज पराठा, पनीर पिझ्झा पराठा, मशरूम पिझ्झा पराठा, चॉकलेट चीज पिझ्झा पराठा ही आमची स्पेशालिटी आहे.
यामधील पिझ्झा पराठा हा प्रकार शहरात आम्हीच पहिल्यांदा सुरू केलाय.
60 ते 170 रुपयांपर्यंत हे पराठे मिळतात, अशी माहिती या पराठा हाऊसचे मालक विशाल कश्यप यांनी दिली.