उन्हाळ्यात बसणार आईस्क्रिमचे चटके!

 उन्हाळा आला की सर्वांना आईस्क्रीम खाण्याचे वेध लागतात. 

या कालावधीमधील कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात आईस्क्रीम असतेच. 

आईस्क्रीम नसेल तर उन्हाळ्यातील कार्यक्रम पूर्ण होत नाहीत, असा अनेकांचा समज आहे. 

पण, वाढत्या महागाईमुळे छत्रपती संभाजी नगरमधील आईस्क्रीच्या किंमतीही वाढल्या आहेत. 

त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना उन्हासोबतच आईस्क्रीमच्या किंमतीचेही चटके सहन करावे लागणार आहेत.

छत्रपती संभाजी नगर शहरात उन्हाळ्याच्या सिझनमध्ये आईस्क्रीम उद्योगात लाखांची उलाढाल होते.

मात्र, यावर्षी आईस्क्रीम आणि ज्यूस सेंटरला महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

आईस्क्रीमसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत.

 तसंच त्यासोबतच दूधही महाग झाल्यानं ही भाववाढ झाली आहे.

यापूर्वी 115 ते 135 रुपयांना मिळणारे फॅमिली पॅक आईस्क्रीमची किंमत आता  175 ते 200 रुपयांपर्यंत पोहचली आहे.