50 मेडल, 20 पेक्षा जास्त ट्रॉफी, कोण आहे ही वैदही?
महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणााऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आलीय.
2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षांसाठी खेळाडू आणि मार्गदर्शक यांना हे पुरस्कार जाहीर झालेत.
छत्रपती संभाजीनगरच्या वैदेही लोहिया हिला हा पुरस्कार जाहीर झालाय.
तलवारबाजी या फारशा प्रचलित नसलेल्या खेळात वैदेहीनं ही कामगिरी केलीय.
मुळची छत्रपती संभाजीनगरची असलेल्या वैदेहीचे वडील व्यावसायिक असून आई गृहिणी आहे.
वैदेहीला लहानपणापासूनच वाचन आणि खेळाची आवड आहे.
तिनं आत्तापर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.
ती चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली असून त्यामध्ये तीन एशियन चॅम्पियनशिप आणि एका वर्ल्डकपचा समावेश आहे.
उझबेकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत वैदेहीनं ब्राँझ मेडलची कमाई केलीय.
50 पेक्षा जास्त मेडल आणि 20 पेक्षा जास्त ट्रॉफी मिळवल्यात.
शिवछत्रपती पुरस्कार मला मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे, अशी भावना वैदेहीनं व्यक्त केलीय.
अन्वीनं दुसऱ्यांदा केली मोहीम फत्ते!
Click Here