छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बस प्रत्येक गावामध्ये जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांना संगणकाचे शिक्षण देण्याचे काम करत आहे.
यामुळे ग्रामीण भागामध्ये आता विद्यार्थी आणि नागरिक सहजपणे संगणक हाताळत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील इंड्यूरन्स कंपनीच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
याच उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना संगणक शिकता यावे यासाठी तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी एका बसमध्ये संगणकासह एलईडी टीव्ही यासह वेगवेगळे साहित्य बसवले.
ही बस प्रत्येक गावामध्ये जाऊन विद्यार्थी आणि नागरिकांना संगणकाचे शिक्षण देण्याचे काम करत आहे.