दीप अमावस्या का साजरी केली जाते? 

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. 

हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही दीप अमवस्या येते. 

याच आषाढी अमावस्येला गटारी किंवा गतहारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं. 

श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा केली जाते. 

या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. 

अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक मानला जातो. 

त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. 

आपल्या आयुष्यामध्ये मांगल्य, समृद्धी नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन केले जाते. 

सर्वप्रथम घरातील सर्व दिवे काढून गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून साफसफाई केली जाते. 

देवासमोर पाट मांडून, रांगोळी काढून दिव्यांची पूजा केली जाते, असं आचार्य श्रीराम धानोरकर सांगतात.

साई मंदिरात नंदी पितोय दूध?

Click Here