शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतानाही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात.
असाच एक प्रयोग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 65 वर्षांच्या शेतकऱ्यानं केला आहे.
पारंपारिक पिकांना फाटा देऊन आपल्या एक एकर शेतीमध्ये शंभर जांभळाच्या झाडांची लागवड करुन ती जांभूळ शेती यशस्वी करून दाखवली आहे.
त्याच्या जांभळाला सध्या बाजारपेठेत 180 ते 200 रुपये किलो भाव मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सानपवाडी या गावातील 65 वर्षांच्या शेतकऱ्याचे नाव जगन्नाथ गायकवाड आहे.
त्यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या शेतात शंभर जांभळीच्या झाडांची लागवड केली होती.
त्यानंतर मागील दोन वर्षापासून या जांभळीला जांभळ लागत असून या जांभळातून त्यांना दरवर्षी कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न होत आहे.
विशेष म्हणजे जांभळीच्या शेतीला पाण्याची खूप कमी प्रमाणात आवश्यकता भासते.
तसेच या जांभळी वरती कुठल्याही फवारणी करण्याची आवश्यकता भासत नाही.
तसेच जांभळीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून दुसरे पिक घेता येते आहे.
यंदा गायकवाड यांच्या एका एका जांभळीच्या झाडाला तब्बल एक क्विंटल पेक्षा अधिक जांभळे लागले आहेत.
या जांभळाला 180 ते 200 रुपये प्रति किलो दर असल्याने त्यांना या जांभळीच्या माध्यमातून लाखों रुपयाचे उत्पन्न होणार असल्याचे जगन्नाथ गायकवाड यांनी सांगितले आहे.