धोनीचा चेला MPL गाजवणार!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेनं भा्रतीय क्रिकेटचा चेहराच बदलून टाकलाय. 

या स्पर्धेनं अनेक खेळाडू टीम इंडियाला दिले आहेत. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या देखील ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. 

या स्पर्धेपासून प्रेरणा घेत प्रत्येक देशानं टी20 लीग सुरू केलीय.

त्याचबरोबर आपल्या देशातील वेगवेगळ्या क्रिकेट असोसिएशननंही त्यांची टी20 लीग स्पर्धा सुरू केली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) यावर्षीपासून महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेचं आयोजन यावर्षी पहिल्यांदाच केलं आहे. 

एमपीएलमध्ये छत्रपती संभाजी किंग (सीएसके) या टीममक़ून हितेश वाळूंज हा पुण्यातील खेळाडू खेळणार आहे. 

 30 वर्षांचा हितेश गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पातळीवरच्या क्रिकेट स्पर्धा खेळतोय. 

लेफ्ट आर्म स्पिनर असलेला हितेश हा उपयुक्त बॅटर देखील असून त्यानं यापूर्वी महाराष्ट्राच्या टीमचंही प्रतिनिधित्व केलंय. 

त्याचबरोबर तो पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज टीममध्ये नेट बॉलर देखील होता.

हितेशला अन्य कोणत्याही भारतीय मुलाप्रमाणेच क्रिकेटची आवड होती. पण, त्यानं क्रिकेट खेळावं हे त्याच्या आईला मान्य नव्हतं.

 वडिलांनी मात्र आपल्याला नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण केल्याचं हितेशनं सांगितलं.