केमिकल इंजिनिअर तरुणाची मसाले दुधासाठी चर्चा!
मुंबईतील इंजिनिअर दुधवाल्यानंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
केमिकल इंजिनिअर झालेला हा तरूण चक्क मसाला दुधाचा व्यवसाय करतोय.
निलेश कडू असं या इंजिनिअर दुधवाल्याचं नाव आहे.
निलेशनं मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतलंय.
2017 साली इंजिनिअर झाल्यानंतर त्यानं पाच वर्ष नोकरीही केली.
त्यानंतर काहीतरी वेगळं करावं या उद्देशानं त्यानं कामोठे आणि खारघरमध्ये मसाला दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
निलेश फिरत्या गाडीवर गरम-गरम मसाला दूध, रबडी असे दूधाचे पदार्थ विकतो.
त्यानं या व्यवसायाला देखील इंजिनिअर दूधवाला असं नाव दिलं आहे.
निलेशनं त्याच्या गाडीवर मसाला दुधाचे फायदे देखील लिहिले आहेत.
लहान मुलं, तरुण, वृद्ध व्यक्ती याबरोबरच आजारी व्यक्तीसाठी देखील हे दूध उपयुक्त आहे.
गरम आणि थंड असे दोन्ही प्रकारात हे दूध मिळते.
रबडी 60 रुपयांपासून तर केसर मसाला दूध 80 रुपयांपासून मिळते, असं निलेश कडूने सांगितलं.