डोंबिवलीच्या चार्मीनं कुरळ्या केसांवर शोधला भन्नाट उपाय!
आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक महिला आणि पुरुषाची इच्छा असते.
अनेक महिला आणि पुरुषांना त्वचा आणि केसांची चमक हवी असते.
पण जर केस कुरळे असतील तर ही काळजी घेणे कठीण जाते.
यामुळे डोंबिवलीत राहणाऱ्या कुरळे केस असणाऱ्या चार्मी वीच्चीव्होराने यावर उपाय शोधला असून केसांची काळजी घेणाऱ्या विविध वस्तू तयार केल्या आहेत.
डोंबिवलीत राहणाऱ्या चार्मी वीच्चीव्होराचे केस कुरळे आहेत.
कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये कुरळ्या केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी हे चार्मीला उलगडत नव्हते.
याच वेळी तिने इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतला असता तिला कुरळ्या केसांची काळजी घेणाऱ्या अनेक गोष्टी दिसल्या.
मात्र, या गोष्टी अत्यंत महाग असल्याने ती त्या खरेदी करू शकली नाही.
त्यानंतर आपण स्वतःच या वस्तू तयार कराव्या अशी कल्पना तिला सुचली आणि तिने कर्ली चार्मी या नावाने आपल्या कंपनीची सुरुवात केली.
यामध्ये तिने सॅटीनचे रबर, टोपी, स्कार्फ, पायनॅपल प्रोटेक्टर, स्क्रंची, सॅटीनचे उशी कव्हर, या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी बटवे अशा विविध गोष्टी तिने बनवल्या.
सॅटीनचा कपडा वापरल्याने केसांना कोणतीही इजा पोहचत नाही, असं चार्मी सांगते.
या सगळ्या वस्तू 65 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत आहेत.
वस्तू विकत घेण्यासाठी कर्ली चार्मी या इंस्टाग्राम पेजवर भेट द्यावी लागेल.
जालन्याच्या मुलीनं रचला इतिहास
Click Here