एकाच ठिकाणी मिळतात जगभरातील 20 चहा

कोल्हापुरात चहाचा कॅफेच सुरू करण्यात आला आहे. चाय बार कॅफे असं या कॅफेचे नाव आहे.

जगभरातील वेगवेगळया प्रकारचे 20 चहा या कॅफे मध्ये मिळतात. 

चाय बार कॅफे विनोद खरात यांनी सुरु केला आहे. 

चाय बार कॅफे मध्ये साधा चहा, तुलसी चहा, दालचिनी चहा, आल्ल्याचा चहा, गवती चहा, पुदिना चहा याबरोबरच मँगो

रोज, पाईनॲप्पल, स्ट्रोबेरी, बदाम, व्हेनीला, केसर इलायची, चॉकलेट, रबडी अशा तब्बल 20 प्रकारचे चहा उपलब्ध आहेत.

तर अमेरीकन आइस-क्रीम चहा, मावा मलई चहा, बटर स्कॉच चहा आणि हॉटेल मॅनेजमेंट स्पेशल चहा असे कधीही न ऐकलेले चहा देखील आपल्याला इथे प्यायला मिळतात.

किती रुपये आहे किंमत ?
चाय बार कॅफे मध्ये मिळणाऱ्या सर्व चहाची किंमत ही 10 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत आहे, असं विनोद खरात यांनी सांगितले.

पत्ता 
खासबाग मैदानजवळ खाऊ गल्ली, कोल्हापूर