सेलिब्रिटींना तरुण करते 'कपिंग थेरपी'
ही चायनीज थेरपी म्हणजे शरीराला आराम देण्याचा हा एक प्रभावी मार्ग मानला जातो.
ही थेरपी सतत घेतल्यास त्वचा घट्ट आणि सुंदर होते. तणाव दूर होतो.
यामध्ये काचेचे कप गरम करून त्यात व्हॅक्यूम तयार केला जातो. हे कप पाठीवर चिकटवून खेचले जातात. त्यामुळे मांसपेशींना आराम मिळतो.
कपिंगच्या तीन ते पाच मिनिटांनंतर दूषित रक्त जमा होतं. शरीरात साचलेलं हे गलिच्छ रक्त काढून टाकलं जातं.
कपिंग थेरपीचे तीन प्रकार आहेत. फायर कपिंग, ड्राय कपिंग, वेट कपिंग.
फायर कपिंग: कॉटन बॉलमध्ये अल्कोहोल घालून त्याला आग लावली जाते. या आगीचा धूर कपात घेऊन कप पाठीवर, खांद्यावर ठेवला जातो, ज्यामुळे त्वचा आतून ताणते.
ड्राय कपिंग: रिकामा कप त्वचेवर असा ठेवला जातो की, त्यात व्हॅक्यूम तयार होतो. यामुळे शरीरातील दूषित रक्त कपाच्या जागी जमा होतं, जे चीरा पाडून बाहेर काढलं जातं.
वेट कपिंग: कप काही विशिष्ट तेलात बुडवून एक्यूप्रेशर पॉईंटवर ठेवला जातो. यात त्वचा ताणल्यामुळे स्नायूंचा त्रास कमी होतो.
राणी क्लियोपेट्राने आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी सुरू केलेल्या या थेरपीचा सध्या प्रचंड ट्रेंड आहे. कलाकारांपासून खेळाडूंपर्यंत अनेकजण ही थेरपी करतात.