बच्चे कंपनीला आता कार्टून देणार पाणी!

उन्हाळा सुरू होताच सर्वांना थंड पाणी पिण्यासाठी माठाची आठवण होते. 

नाशिकच्या बाजारातही ठिकठिकाणी माठांची विक्री होत आहे.

सध्या बाजारात विविध आकाराचे आणि विविध रंगाचे माठ उपलब्ध आहेत.

लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी नवी शक्कल लढवली आहे.

नाशिकच्या बाजारपेठेत कार्टूनचं चित्र असलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

या माठांची किंमत साधारण 700 ते 800 आहे. 

या अनोख्या माठात सात ते आठ लिटर पाणी बसते.

मालेगाव स्टँड बाजारपेठ भागात हे माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदा पहिल्यांदाच असे माठ बाजारात आल्यामुळे लहान मुलांच्या आग्रहाखातर अनेकजण खरेदी करत आहेत.

चक्क ATM नं पाणी मिळणारं गाव!

Click Here