...लेकाला नोकरी करताना पाहायचं राहून गेलं!

 बुलढाण्याच्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात 25 जणांच्या मृत्यूने महाराष्ट्राला जबर हादरा बसला आहे. 

 समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 

या अपघातामुळेसंपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. वर्धा जिल्ह्यातील 14 प्रवासी या बस मध्ये प्रवास करत होते. 

मध्यरात्री घडलेल्या या अपघाताने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 14 प्रवाशांमध्ये तेजस पोकळे नावाचा एक 20 वर्षाचा तरुण इंजिनियर देखील होता.

 वडिलांनी हातमजुरी करून लेकाला शिकवलं. मुलानंही मोठ्या जिद्दीनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

कॅम्पस इंटरव्ह्यू मधूनच पुण्यातील एका कंपनीच चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली. 

 वडिलांनी नोकरी जॉईन करायला निघालेल्या मुलाला बसमध्ये बसवलं.

पण वाटतेच काळानं घात केला आणि मुलाला नोकरी करताना पाहण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, ही व्यथा वर्ध्यातील तेजस पोकळे याच्या आई-वडिलांची आहे.