अंध तरुणाची गोपालनातून लाखोंची कमाई

प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस आकाशालाही गवसणी घालू शकते. 

सांगलीतील जन्मत: अंध असणाऱ्या ओंकार गायकवाड याने वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

ओंकार हा आटपाडी तालुक्यातील शेटफळेच्या शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. 

स्वत: अंध असला तरी आपल्या कर्तृत्वाचा प्रकाश निर्माण करण्याची त्याची जिद्द आहे.

शिक्षण घेऊनही नोकरीच्या शोधात न जाता त्यानं वडिलोपार्जित व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. 

ओंकारचं कुटूंब पिढीजात देशी खिलार गाईचे संगोपन करतं.

ओंकारनेही अभ्यासाअंती गाईंचा प्रशस्त गोठा तयार करून गोपालन सुरू केले. 

सध्या ओंकारकडे 30 जातिवंत खिलार गाई असून सर्व कामे तो स्वत: करतो.

दूध, गोवऱ्या आणि गोमुत्र विक्रीतून ओंकार लाखो रुपये कमावत आहे. 

दिव्यांगांना स्वावलंबी करणारं स्वाधार केंद्!

Click Here