रुग्णालयात आला अजगर; उडाली खळबळ
पश्चिम बंगालच्या फलकट्टा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात रुग्ण घेऊन आला भलामोठा अजगर.
10 फूट लांबीचा महाकाय अजगर पाहून डॉक्टर आणि रुग्णांना भरली धडकी.
रस्त्यात आपण काहीतरी मऊ गिळगिळीत वस्तूवर उभं राहिलोय, असं श्यामलला जाणवलं.
काही कळायच्या आत पायाला अनेक जखमा झाल्या. त्याने याबाबत गौतमला सांगितलं. गौतमने तातडीने रुग्णालय गाठलं.
'अजगर वेटोळा घालून झोपला होता. त्याच्यावर काकांचा पाय पडताच त्याने चावा घेतला. काकांना रुग्णालयात नेणं गरजेचं होतं, अजगर साधा आहे की विषारी मला कळलं नाही, म्हणून त्याला गोणीत भरून सोबत नेलं' - गौतम
गौतमने गोणीतून अजगर काढताच रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर, रुग्ण चक्रावले.
'अजगराला रुग्णालयात आणण्याची काहीच गरज नव्हती. त्याच्यामुळे कित्येकजणांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.' - रुग्णालय प्रशासन
रुग्णालय प्रशासनाने वनविभागाला कळवलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला निसर्ग निरीक्षण केंद्रात नेलं.
आता अजगराची तपासणी होऊन त्याच्यावर योग्य ते उपचार केले जातील.