बाबो...! 2 लाखांचा एक मासा?
'मासे' म्हणजे मांसाहारप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय.
तुम्ही कितीही मोठे मांसाहारप्रेमी असलात, तरी लाखोंचा मासा खरेदी कराल?
बिहारच्या बांका जिल्ह्यात मिळतो, तब्बल 2 लाखांचा एक मासा.
नाही नाही, वेळेला 2 लाखांचा मासा कसा खायचा? एवढी उधळपट्टी? असा विचार तुमच्याही मनात आला असेल, तर ऐका...
'हा' मासा खायचा नाही, बरं का. तर त्याला केवळ पाहूनच मन भरायचं.
बिहारच्या बांका जिल्ह्यातील मनिया गावात लोक बनवतात शुद्ध चांदीचे शोभेचे मासे. त्यांना विदेशातूनही येते मोठी मागणी.
2 हजारांपासून 2 लाखांपर्यंत चांदीचे मासे इथे मिळतात. शिवाय ग्राहकांना परवडावं म्हणून हवे तसे मासेही बनवून दिले जातात.
धार्मिक शास्त्रानुसार चांदीला आहे अनन्यसाधारण महत्त्व. चांदी शुभ आणि शीतल मानली जाते.
चांदीचा कासव, चांदीचा हत्ती, चांदीचा मासा जवळ बाळगणं शुभ मानलं जातं.