डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभारत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
14 एप्रिलचे वेध लागताच देशभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते.
आता सोशल मीडियावर लातूरमधील एका रिक्षाची खूप चर्चा आहे.
भीम जयंतीनिमित्त उमेश कांबळे याने आपल्या रिक्षाला सजवले आहे.
रिक्षावर साकारलेली दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची कमान सर्वांचे लक्ष वेधत आहे.
डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा लोकांपर्यंत नेण्यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचे उमेश सांगतो.
जवळ पैसे नसल्याने उमेश याने 25 हजार रुपयांचे कर्ज काढून रिक्षा सजवली आहे.
दिवसभर रिक्षा चालवून उमेश आणि त्याच्या भावाने रिक्षाला आकर्षक रूप दिलं.
संपूर्ण लातूर शहरात उमेश कांबळेची ही रिक्षा आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
चक्क एका तिळावर रेखाटले शिवराय!
Click Here