अस्सल सोलापुरी नॉनव्हेजसाठी 'इथं' भेट द्या
सोलापूरमध्ये सध्या भावसार कुटुंबीयांची आई हिंगोली आंबिका भावसार खानवळ चांगलीच गाजत आहेत.
किसन गर्जे हे या खानावळीचे मालक आहेत.
त्यांनी सुरूवातीला कन्ना चौकात छोट्याशा गाडीवर नॉनव्हेजमधील विविध पदार्थांचा स्टॉल टाकला होता.
त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद लक्षात घेऊनच त्यांनी खानावळ सुरू केली.
भावसार खानववळीमधील मटन जिगरी, मटन कलेजी, मटन मसाला, सुके मटन हे पदार्थ मिळतात.
यासोबत खिमा उंडे आणि मेथी खिमा हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.
स्वच्छ आणि ताजे मटन तसंच विशिष्ट प्रकारचे घरगुती काळे तिखट वापरुन इथं हे सर्व पदार्थ केले जातात.
त्याचबरोबर ग्राहकांना सोलापूरची ओळख असलेली कडक भाकरीही देण्यात येते.