दुष्काळी भागात स्ट्रॉबेरीची शेती! 

सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि आटपाडी हे पूर्व भागातील तालुके दुष्काळी म्हणून ओळखले जातात.

याच पूर्व भागात टेंभू योजनेतून कृष्णेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचे जीवनच बदलून गेले आहे.

जमिनीत आता उसाच्या शेतीसह नवनवीन प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. 

 यातच आता खानापूर घाटमाथ्यावर स्ट्राबेरीची शेती फुलली आहे.

घाटमाथ्यावरील राहुल भगत व अमोल भगत या युवा शेतकऱ्यांनी स्ट्राबेरी शेतीचा प्रयोग केला आहे.

भगत बंधूंनी आपल्या दीड एकर स्ट्रॉबेरीची लागण केली आहे.

स्ट्रॉबेरी लागवड आणि औषधांसाठी त्यांना 4 लाख रुपये खर्च आला.

 चार महिन्यानंतर स्ट्रॉबेरी विक्रीसाठी तयार झाली आहे.

स्थानिक बाजारपेठ आणि सांगली, कोल्हापूर मार्केटला भगत यांची स्ट्राबेरी विक्रीस जाते.

 भगत यांना खर्च सोडून आतापर्यंत 3 लाखांचा फायदा झाला आहे आणि उत्पादन अद्याप सुरू आहे.

खानापूर सारख्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात स्ट्रॉबेरी पिकवल्याने भगत बंधूंचे कौतुक होत आहे.