इथं खरेदी करा स्वस्तात मस्त पर्स
पुण्यातील तरुणींच्या शॉपिंगसाठी सर्वात फेमस भाग म्हणून फर्ग्युसन कॉलेज अर्थात एफसी रोडची ओळख आहे.
जगभरातील लेटेस्ट फॅशन इथं तात्काळ आणि बजेटला परवडेल या दरामध्ये खरेदी करता येते.
त्यामुळे या भागातील दुकानांमध्ये तरुणींची नेहमीच गर्दी असते. इथं तरुणींना नेहमी लागणाऱ्या पर्स देखील अगदी कमी किंमतीमध्ये मिळतात.
फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या शिरोळे मार्केट आणि केसरी मार्केट अशा दोन मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स खरेदी करता येतात.
त्यासाठी तुम्हाला या मार्केटमध्ये थोडं आत जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला अगदी दीडशे रूपयांपासून वेगवेगळ्या पर्स मिळतात.
या पर्सच्या क्वालिटीमध्ये विविधता असून त्यानुसार किंमतीमध्येही फरक आहे.
कोणते प्रकार उपलब्ध?
पर्समध्ये क्लचेस, पाऊच, फायबर पर्स, मेकअप बॅग, सॅक कम पर्स, हेवी डिझायनर पर्सेस या सारख्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पर्स इथं मिळतात.
त्याचबरोबर एखाद्या लग्नाच्या ठिकाणी किंवा इव्हेंटसाठी सुट होतील अशा हेवी लुकच्या पर्स देखील इथं अगदी पाचशे रूपयांपासून मिळतात.