सध्या देशात सुशिक्षित बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आहे.
सांगलीतील करण सातपुते याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
इंजिनिअर झाल्यानंतर शोध घेऊनही नोकरी मिळाली नाही.
सुशिक्षित बेरोजगार करणने चहाचा गाडा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर चहाचा स्टॉल सुरू केला.
करणने 'बेरोजगार टी स्टॉल' असेच नाव व्यवसायाला दिले.
आता रोज 500 ते 600 कप चहाची विक्री होत आहे.
चहाच्या विक्रीतून करण महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमावत आहे.
करणला व्यवसायासाठी कुटुंबीयांकडूनही सहकार्य मिळाले.