सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य अनेकांना आधार देतं.
बीड सारख्या ग्रामीण भागात आजही अनेक तरुण विशेषतः पोलीस भरतीची तयारी करतात.
ग्रामीण भागात पाहिजे तसे क्लासेस आणि योग्य मार्गदर्शनाच्या सुविधा आजही उपलब्ध नाहीत.
मात्र मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सध्या अनेक तरुण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत आहेत.
नुकताच मुंबई पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला असून बीड जिल्ह्यातील तरुणांनी यश मिळवलंय
गावातील दोन तरुण पहिल्यांदाच पोलीस झाल्याने रत्नागिरीत त्यांचं कौतुक होत आहे.
मच्छिंद्र बाजीराव घल्लाळ याची नुकतीच मुंबई पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे.
मच्छिंद्र शेतीची कामे करून पोलीस भरतीचा सराव आणि अभ्यास करत होता.
त्यानं 2018 पासून पोलीस भरती परीक्षेला सुरुवात केली पण अनेकदा अपयश आलं.
या अपयशाला न जुमानता अभ्यास सुरू ठेवला, दिवस रात्र मेहनत केली आणि यश खेचून आणलं.
पठ्ठ्यानं मुंबई पोलीस होऊनच दाखवलं!
Click Here