शेती बेभरवशाची झाल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीच्या प्रयत्नात असतात.
दिवस-रात्र मेहनत करत शासकीय नोकरी मिळावी यासाठी अभ्यास देखील करत असतात.
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागली आहेत.
नुकताच महाराष्ट्र पोलीस दलामधील भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर झाला.
यामध्ये रत्नागिरी गावातील समाधान चक्रेची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली आहे.
रत्नागिरीतील जमीन खडकाळ तर पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यानं समाधाननं पोलीस भरतीचा मार्ग पत्करला
समाधान आणि त्याच्या मित्रानं गावातच पोलीस भरतीचा सराव आणि अभ्यास केला.
घरची परिस्थिती बेताची असल्यानं दोघही काम करून अभ्यास करत होते.
यशानं दोनदा हुलकावणी दिली मात्र अपयशानं खचून न जाता त्यानं प्रयत्न सुरूच ठेवले.
अखेर समाधान आणि मित्र मच्छिंद्र घल्लाळ हे गावातील पहिले पोलीस झाले आहेत.
Click Here