सध्याच्या काळामध्ये लाखो रुपये खर्चून मुले उच्च शिक्षण घेत आहेत.
उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्याने अनेक बेरोजगार तरुण पुन्हा गावाचा रस्ता धरतात.
बीड जिल्ह्यातील कडा गावच्या शेतकरी पुत्रानं मात्र एक वेगळा आदर्श निर्माण केलाय.
पंकज पाटील हा उच्च शिक्षित तरुण गावातच राहून लाखोंची उलाढाल करतोय.
पंकजनं पदवीचं शिक्षण घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहिरात कंपनीत काम केलं.
नोकरी परवडत नव्हती म्हणून पंकजनं राजीनामा दिला आणि गावाची वाट धरली.
वडिलार्जित शेती करताना जोडधंदा म्हणून पशुपालन सुरू केले.
पंकज यांनी सुरुवातीला पाच गाई आणि पाच म्हशी घेतल्या व दुग्ध व्यवसाय सुरू केला.
सध्या पंकज कडे 40 गाई आणि 60 म्हशी असून रोज 400 ते 425 लिटर दुधाची विक्री होतेय.
पंकज हे दुग्धजन्य पदार्थ बनवत असून महिनाकाठी 1 लाख ते 1 लाख 20 हजार रुपये मिळत आहेत.
विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!
Click Here