हॉटेल कामगार करतोय लाखोंची कमाई

आजकाल फास्ट फूड खाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून अशा पदार्थांच्या गाड्यावर गर्दी असते. 

त्यामुळे वडापाव, पॅटीस, सँडविच, बर्गर सारख्या खाद्य पदार्थांच्या व्यवसायाकडे कल वाढतोय.

बीडमधील हॉटेल कामगार असणाऱ्या भारत गनगे यांनी 20 वर्षांपूर्वी वडापावचा गाडा सुरू केला. 

बार्शी नाका परिसरामध्ये एका छोट्या गाड्यावर सुरू केलेल्या वडापावला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे भारत हे गाड्यावर विविध प्रयोग करत होते आणि सहज बनवलेल्या एका पॅटीसनं किमया केली. 

भारत यांनी एकदा घरच्या घरीच पावांमध्ये भाजी भरून हावडा डाळीच्या पिठामध्ये तळला. 

या नव्या पदार्थाची चव अप्रतिम लागल्याने त्यांनी मित्र परिवारालाही हे पॅटीस खायला दिले. 

सर्वांनाच पॅटीसची चव आवडल्याने त्यांनी वडापावसोबत पॅटीस विक्री सुरू केली. 

पुढे पॅटीस खाण्यासाठी लोकांची गर्दी वाढत गेली आणि सध्या दिवसाला 500 ते 600 प्लेटची विक्री होते. 

1998 साली दीड रुपये असणारा पॅटीस प्लेटचा दर आता दहा रुपये झाला असून चांगली कमाई होत आहे.

अन्वीनं दुसऱ्यांदा केली मोहीम फत्ते!

Click Here