15 लाख झाडं लावणारा ट्री मॅन!

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड ही काळाजी गरज झाली आहे. 

सध्याच्या काळात शासन स्तरावरूनही वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या जातात. 

बीडमधील सुरेश देशमुख हे गेल्या 40 वर्षांपासून वृक्ष लागवड व संगोपनाचे कार्य करीत आहेत. 

देशमुख यांनी गावोगावी फिरून आतापर्यंत जवळपास 15 लाख झाडांची लागवड केली आहे. 

देशमुख यांनी लावलेल्या झाडांपैकी जवळपास 8 ते 9 लाख झाडे आता मोठी झाली आहेत. 

निसर्गात शुद्ध हवा मिळावी, असा या वृक्ष लागवडीचा उद्देश असल्याचे देशमुख सांगतात. 

देशमुख यांच्या निसर्ग कार्याची दखल विविध संस्था व संघटनांनीही घेतली आहे. 

वन विभागाच्या वतीने देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

देशमुख हे शुभकार्य, समारंभ, वाढदिवस, लग्न, अशा कार्यक्रमात समोरच्या व्यक्तीला झाडाचं रोपट भेट देतात. 

कमवा आणि शिका मोफत रोपवाटिकेची स्थापना केली असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतोय.

बीडमधील 'ही' 5 ठिकाणे नक्की पाहा!

Click Here