महाराष्ट्रामध्ये सध्या पारंपरिक शेतीपेक्षा फळांची शेती फायद्याची ठरत आहे.
बाजारात चिकूला मोठी मागणी असल्याने चिकूची शेती आर्थिक फायदा देणारी ठरते.
चिकूची लागवड करताना योग्य तंत्र वापरले पाहिजे असे, बीडमधील कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक सांगतात.
चिकूची लागवड करताना 10 × 10 अशा पद्धतीने करावी. दाटीच्या लागवडीचे सूत्र योग्य ठरत नाही.
सदाहरित वर्गातील चिकू हवामान व जमिनीबाबत चोखंदळ नसून अतिथंड प्रदेश वगळता सर्वत्र येतो.
चिकूची उष्ण व दमट हवामानात चांगली वाढ होते व उत्पन्नीही चांगले मिळते.
पावसाळ्यात झाडांच्या रांगांमधल्या मोकळ्या जमिनीत तागाचा किंवा धैंचाचा बेवड करतात.
चिकूच्या एक वर्षाच्या झाडाला अंदाजे 25 किलो शेणखत व अर्धा किलो पेंड देतात.
चिकूच्या झाडांना हिवाळ्यात 8 व उन्हाळ्यात 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
कालीपत्ती, क्रिकेट बॉल, छत्रीया या जातीचे चिकू लागवड फायद्याची ठरते.
कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती
Click Here