कलेच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार
आपल्या देशाला हस्तकलेची मोठी परंपरा आहे. वेगवेगळ्या राज्यात या कलेचा प्रसार झाला.
विशेष म्हणजे आजही यापैकी काही कला टिकून आहेत.
गुजरात राज्यातील भावनगरमध्ये विविध आकारांच्या रंगीत मण्यांचा वापर करुन एक कला जोपसण्यात आली आहे.
काठेवाडी संस्कृतीचा भाग असलेल्या या कलेला सुशोमन किंवा बीडवर्क असं म्हंटलं जातं.
नवी मुंबईत सुरू असलेल्या प्रदर्शनात याबाबतचा एक खास स्टॉल लावण्यात आला आहे.
भावनगर जिल्ह्यातील अमरगड गावातील महिलांनी आजही ही परंपरा जपून ठेवली आहे.
या गावातील प्रत्येक महिलेला ही कला येते.
बीडवर्कच्या माध्यमातून दीडशेपेक्षा जास्त वस्तू तयार केल्या जातात.
बारीक नक्षीकाम करून पारंपारिक तोरण, पूजेला लागणाऱ्या वस्तू, चौरंग, दागिने, किचन, हंडा अशा विविध वस्तू तयार केल्या जातात.
या वस्तूंची किंमत 50 रुपयापासून ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे.
बीडवर्कच्या माध्यमातून जवळपास पाचशे महिलांना रोजगार मिळाला आहे.